रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात 13 जुलै रोजी सादर होणार संगमेश्वरी रायता हा तुफान विनोदी कार्यक्रम
रत्नागिरी दि.४ (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर संस्था ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने शनिवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता “संगमेश्वरी रायता” या संगमेश्वरी बोली भाषेतील तुफान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सादरकर्ते सुनील बेंडखळे सचिन काळे आणि राजेश उर्फ पिंट्या चव्हाण यांचा या कार्यक्रमात सहभाग असून ते संगमेश्वरी बोली भाषेत प्रेक्षकांशी गप्पा मारून त्यांनाही संगमेश्वरी भाषेत बोलते करणार आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांबरोबरच आबालवृद्धानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवावी, असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश उर्फ अण्णा लिमये आणि सचिव समाज भूषण श्री. सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.”संगमेश्वरी रायता” हा विनोदी कार्यक्रम राज्यस्तरावरही गाजत आहे. श्रीराम मंदिर संस्था रत्नागिरी कट्ट्यातर्फे गेली तीन वर्षे ज्येष्ठांसाठी स्नेह मेळाव्याबरोबरच विविध विषयांवरील प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून जेष्ठांना नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याला ज्येष्ठांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. 13 जुलै रोजीचा “संगमेश्वरी रायता” हा कार्यक्रम ही विशेष रंजक ठरेल आणि सर्वांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.