माझी वसुंधरा योजनेखाली प्रत्येक गाव होणार हिरवेगार अन प्रदूषणमुक्त
शासनाने माझी वसुंधरा-५.० योजना राबवून गावातील वातावरण प्रदूषणमुक्त अन हिरवेगार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गावात ग्रामपंचायतीतर्फे विविध जातीची ४०० रोपांची लागवड केली जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. गावपातळीवर होणार्या वृक्षारोपणामुळे पर्यावरण सुरक्षित राहण्यासह गावेही हिरवीगार अन प्रदूषणमुक्त होणार आहेत. यामुळे ऑक्सिजन निर्मितीलाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.www.konkantoday.com