भारतीय टीमच्या स्वागतासाठी दिल्लीतील हॉटेलने बनविला ट्रॉफीच्या आकारात विशेष केक
कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.याच निमित्ताने दिल्लीतील आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडियासाठी स्पेशल केक बनवला आहे.विश्वविजय टीम इंडियाच्या थीमवर आधारित हा केक तयार करण्यात आला आहे. यासाठी हॉटेलच्या स्टाफने संपूर्ण रात्रभर मेहनत केली.या संदर्भात आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलचे शेफ शिवनीत पाहोजा म्हणतात, “केक टीम इंडिया संघाच्या जर्सीच्या रंगात आहे.”या केकचं वैशिष्ट्य म्हणजे हा केक खऱ्या ट्रॉफीसारखा दिसू शकतो, पण हा केक खास चॉकलेटपासून तयार करण्यात आला आहे.www.konkantoday.com