भंगारवाल्या महिलांचे धाडस वाढले चक्क रेल्वे रुळाच्या 223 चाव्या चोरल्या ,आता जेलची हवा

* शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पहाटे उठून भंगारच्या नावाखाली चोऱ्या करणाऱ्या भंगारवाल्या महिलांचे धाडस आता वाढत चालले आहेकोकण रेल्वे मार्गावरील पानवाल पूल ते कोंडवी गाव मार्गावरील रेल्वे रुळाच्या 223 लोखंडी चाव्या या महिलांनी चोरून नेल्या याबाबत पोलिसांनी तपास करून लोखंडी चाव्या लांबविणाऱ्या दोन महिलांना ग्रामीण पोलिसांनी लांजा येथून अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. स्थानिक पोलीस पाटलांच्या मदतीने ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.कोकण रेल्वे मार्गावरील पानवल ब्रीज ते कोंडवी गांव रेल्वे कि.मी. २१०/९ ते २१७/० या रेल्वे लाईन वरील रेल्वे रूळाच्या एकुण २२३ लोखंडी चाव्या कोणीतरी अशात चोरट्याने चोरून नेले बाबत रत्नागिरी रेल्वे अधिकारी यांनी दिले तक्रारी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयाचे तपासकामी पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीम. जयश्री गायकवाड, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखालो रेल्वे सुरक्षेच्या अनुषंगाने तात्काळ गुन्हयाचे तपासा करीता पोनि श्री. नितीन ढेरे, प्रभारी अधिकारी रत्नागिरी ग्रामीण, यांचे नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेणेकामी पथके रवाना करण्यात आली. आरोपिचा शोध घेत असताना कोंडवी गांवचे पोलीस पाटील श्रीम. प्रेरणा नितीन दळवी तसेच चांदेराई ईब्राहिमपट्टण गावाचे पोलीस पाटील श्री. विलास जयराम शिवगण यांनी गावात फिरणाऱ्या अनोळखी भंगार गोळा करणाऱ्या संशयीत महिलांची माहिती दिल्याने त्या महिलांचा पथका मार्फत शोध घेवून त्यांचेकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देवून चोरी केलेल्या एकूण २२३ लोखंडी चाव्या दोन आरोपी महिलांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.पोलीस पाटील यांचेकडून मिळालेल्या अचुक माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपीत यांना ४८ तासांचे आतमध्ये लांजा या गावी जावून त्यांना पकडून त्यांचे ताब्यात असलेला चोरिला गेलेला मुद्देमाल २२३ लोखंडी चाव्या ताब्यात घेवून १०० टक्के मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे.या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी मा. श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक साो रत्नागिरी, मा.श्रीम. जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक साो रत्नागिरी, श्री. नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे मार्फत तयार करण्यात आलेल्या तपास पथकामध्ये सपोफौ एम.आर. कांबळे, सपोफौ एस.बी. कांबळे, सपोफौ एस.एम. सावंत, पोहेकाँ ओ.जी. कांबळे, पोहेकाँ आर.डी. पावसकर, पोहेकाँ बी.बी. सवाईराम, पोहेकाँ यु.व्ही. गायकवाड, पोहेकाँ आर. आर. भिसे, मपोहेकाँ टी. आर. सावंतदेसाई, मपोना वाय.एस. नाटुस्कर, मपोना पी.ए.रहाटे यांनी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button