टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल
अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे.गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्कार आणि स्वागत झाल्यानंतर दुपारी मुंबईत विजयी यात्रा होणार आहे.रोहित शर्माच्या भारतीय संघाने भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री अंतिम सामना जिंकून विजेतेपद मिळवल्यांतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मायदेशी परतणे अपेक्षित होते; परंतु बार्बाडोसवर धडकणाऱ्या चक्रिवादळाने भारतीय संघाला तिथेच थांबावे लागले होते