गेल्या काही वर्षे रखडलेल्या लांजातील उड्डाण पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला
गेल्या काही वर्षे रखडलेल्या लांजात शहरातील उड्डाणपूल पूर्ण होईल अशी माहिती महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली.कोर्ले तिठा जुने सार्दळ दुकान ते साटवली तिठा असा एकूण ४७ खांबांचाा ९०० मीटर लांबीचा उड्डाण पूल आहे. लांजा ग्रामीण रूग्णालय साटवली तिठा या ठिकाणी भुयारी मार्ग आहे. लांजा हायस्कूल, लांजा पंचायत समिती आणि तहसिलदार कार्यालय या ठिकाणी जाण्यासाठी सर्व्हिस रोड पादचारी मार्ग आहे.सुमारे ७ वर्षापासून शहरातील उड्डाणपूल लक्षवेधी ठरला होता. सुरूवातीला हॅन या कन्स्ट्रक्शन कंपनीने उड्डाणपुलाचा ठेका घेतला होता. परंतु विहित वेळेत पूर्ण न झाल्याने या कंपनीचा ठेका ढरद्द करून ईगल या कन्स्ट्रक्शन कंपनीला या उड्डाणपुलाच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. नव्या कंपनीने पुन्हा नव्याने उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे. www.konkantoday.com