आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश, चिपळूणच्या १६० कोटींच्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेला मंजुरी
चिपळूण शहराला कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हीटीने करण्यात येणार्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६० कोटींच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळवण्यात चिपळूण-संगमेेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांना मंगळवारी यश मिळाले आहे.गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न रखडला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शेखर निकम यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना मंगळवारी यश आले. लवकरच या योजनेला प्रशासकीय मंजुरीही मिळणार आहे. मंगळवारी या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर आमदार निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत. यानिमित्ताने गेली अनेक वर्षे ग्रॅव्हीटी पाणीपुरवठा योजनेची स्वप्ने पाहणार्या चिपळूणकरांचे स्वप्न सत्याात उतरले आहे. आमदार शेखर निकम यांनी मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे चिपळूण शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.www.konkantoday.com