आमदार चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५

 लांजा राजापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय राजन साळवी साहेब यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन व लांजा तालुका कॅरम असोसिएशन आयोजित आमदार चषक या नावाने वर्षातील पहिली जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ रोजी कुणबी सेवा संघ हॉल लांजा, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक ०६जुलै २०२४ ते ०७ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. सदर स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महीला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी १५०/- रुपये व दुहेरी गटासाठी ३००/- रुपये याप्रमाणे राहील. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे आवश्यक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका गुरुवार दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासहीत तालुका प्रतिनिधीकडे द्यावात. स्पर्धेत खेळणासाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला पांढरा रंगाचा तिशर्ट खेळाडूने परीधान करणे आवश्यक आहे.तालुका प्रतिनिधी खालील प्रमाणे१ ) गुहागर  श्री प्रदीप परचुरे  ( ९४२३०४८२५० )२ ) रत्नागिरी  श्री विनायक जोशी ( ८३९०३८७४८३ )३ ) देवरूख  श्री राहुल भस्मे ( ९६५७६३७६७८ )४ ) चिपळूण  श्री साईप्रकाश कानिटकर ( ९४०३५६४७८२ ) , श्री दीपक वाटेकर ( ९९७५५४६६२५ )५ ) संगमेश्वर  श्री मनमोहन बेंडके (  ९१३०३०६५२५ )६ ) लांजा  श्री विलास इंदुलकर ( ९४०३७६९४४९ )७ ) खेड  श्री योगेश आपटे ( ९९५३२२२६३१ )८ ) राजापूर  श्री मनोज सप्रे ( ९४०३७६८३७६ )स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राष्ट्रीय पंच श्री साईप्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच श्री मंदार दळवी त्याच प्रमाणे स्पर्धा प्रमुख म्हणून श्री अमित देसाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन श्री राहुल शिंदे ( श्री अध्यक्ष, लांजा तालुका कॅरम असोसिएशन ),  प्रदीप भाटकर ( अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुरेंद्र देसाई ( उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुचय अण्णा रेडीज ( सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री मिलींद साप्ते ( सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) व लांजा तालुका कॅरम असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button