समत्व ट्रस्ट ठाणे तर्फे शाळा चवे बौद्धवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

सामाजिक जाणिवेतून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, खेड व रत्नागिरी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे संपूर्ण साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम समत्व ट्रस्ट ठाणे यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. समत्व ट्रस्ट ठाणे हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोकणात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याच्या उद्देशाने हे ट्रस्ट सतत प्रयत्नशील असते. याच समत्व ट्रस्ट ठाणे यांच्यावतीने शाळा चवे बौद्धवाडी सह जिल्ह्यातील इतर 33 शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर आवश्यकता असणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यात शंभर व दोनशे पानी एकरेघी, दुरेघी, चौरेघी वह्या त्याचबरोबर रंगीत खडू बॉक्स, कंपास पेटी, चित्रकला वही याचा समावेश आहे. समत्व ट्रस्टचे विश्वस्त तथा मुख्य जनसंपर्क प्रमुख कोकण विभाग आदरणीय श्री. नरेंद्र खानविलकर, रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. पाटील सर, समत्व ट्रस्टचे सदस्य श्री. रविंद्र महाडिक, शाळा चवे निवईचे शिक्षण प्रेमी श्री. किसन शेठ सागवेकर व ओरीचे केंद्रप्रमुख श्री. प्रकाश कळंबटे सर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाळेतील विद्यार्थी व पालकांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाबाबत पालकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल अलकटवार सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button