
शेतकरी व कृषी आधारीत उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता कृषी विद्यापीठाचेही युट्यूब चॅनल
कृषी दिनानिमित्त सोमवारी कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलचे उदघाटन करण्यात आले. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन शेतकरी व कृषी आधारीत उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. भावे यांनी केले.www.konkantoday.com