
रत्नागिरीतील जेष्ठ गायक सलीम भाटकर यांचे मुंबई येथे अपघाती निधन
रत्नागिरी : जुन्या जमान्यातील ऑर्केस्ट्रा शालिमार, ऑर्केस्ट्रा हंगामा, ऑर्केस्ट्रा म्युझिक वेव्हज तसेच ऑर्केस्ट्रा साज और आवाज मधून किशोर कुमार, शब्बीर कुमार, बप्पी लाहेरी यांच्या हुबेहुब आवाजात गाणी म्हणणारे तसेच धनाजी नाका बाजारपेठ येथे अनेक वर्षे प्रसिद्ध “स्टायलो टेलर” या नावाने टेलरीग व्यवसाय करणारे “सलीम भाटकर” यांचे काल सायंकाळी ७-३० वा. चे दरम्यान हॉटेल निसर्ग मध्ये ऑर्केस्ट्रा कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असतांना मुंबई तळोजा हायवेवर मागून येणाऱ्या भरडाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली आणि ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचे जागीच निधन झाले व ट्रक चालकाने ट्रक न थांबवता तो तसाच पसार झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच रत्नागिरीतील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली, अनेक कलाकारांनी व मित्र मंडळींनी हळहळ व्यक्त केली.अत्यन्त सरळ आणि प्रेमळ स्वभावाचे सलीम भाटकर यांचा मित्रपरिवार ही तीतकाच मोठा होता. जुन्या काळातील प्रसिद्ध गायक म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईत गेल्यावर त्यांनी तिथेही आपल्या गायकीचा ठसा उमटवला होता. www.konkantoday.com