रत्नागिरीतील गोखले नाका येथील प्रसिद्ध जनता ग्रंथ भांडारचे मालक सुरेंद्र जनार्दन उर्फ जया रेडिज यांचे दु:खद निधन

*रत्नागिरीतील गोखले नाका येथील प्रसिद्ध जनता ग्रंथ भांडारचे मालक सुरेंद्र जनार्दन उर्फ जया रेडिज यांचे आज सायंकाळी ह्यदयविकाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे ६२ वर्ष होते. जया रेडिज या नावाने ते सुपरिचित होते. पतित पावन मंदिर संस्थेचे कार्यकर्ते व अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष होते. अनेक संस्थांच्या कार्यकारीणीचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button