
देवरूखात खत साठा संपल्याने शेतकरी हैराण
खरीप हंगामासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. कोकणात सर्वाधिक भातशेतीला युरिया खत वापरले जाते. पाऊस पडल्यानंतर पेरण्यांची कामे सुरू झाली आहेत. पाऊस पडत असल्याने खत खरेदी करण्यासाठी शेतकर्यांनी गर्दी केली आहे. खरीप हंगामासाठी संगमेश्वर तालुक्यासाठी २३८ टन खत प्राप्त झाले होते. संगमेश्वर तालुक्यात सहा परवानाधारक खत विक्रेते आहेत. त्यामध्ये देवरूख शहरात केवळ एकच खत विक्रेता आहे. तर संगमेश्वरमध्ये दोन, आरवली येथे सोसायटी, साखरपा येथे दोन खत विक्रेते आहेत.www.konkantoday.com