
चिपळूण शहरातील मार्कंडी परिसरात वेश्या व्यवसाय प्रकरणी एजंटला न्यायालयीन कोठडी
चिपळूण शहरातील मार्कंडी परिसरात तिशा प्लाझा रेसिडेन्सीमध्ये तिसर्या मजल्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी एजंट राजेंद्र दत्ताराम नरोडे (४९, पळस्पे फाटा, पनवेल) याला अटक करण्यात आली होती. सोमवारी त्याची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयायीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिपळूण शहरातील तिशा प्लाझा रेसीडेन्सीमध्ये तिसर्या मजल्यावर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचुन या अपार्टमेंटमध्ये टाकलेल्या धाडीत एका सदनिकेत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या २७ व ३० वर्षे वयाच्या दोन तरूणी, एक एजंट महिला व राजेंद्र नरोडे असे चौघेजण सापडले होते. याप्रकरणी नरोडे याला अटक करण्यात आली असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. www.konkantoday.com