
चिपळुणातील उड्डाण पुलाच्या कामाला गती नाही, काम पडणार लांबणीवर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम ठेकेदार कंपनीने पुन्हा सुरू केले आहे. नवीन डिझाईननुसार दोन पिलरच्यामध्ये दर ×२० मीटरवर नवीन पिलर उभारला जात आहे. अद्याप या कामाला गती प्राप्त झालेली नसल्याने हे काम आणखी काही महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उड्डाण पूल दुर्घटनेला ९ महिन्यांचा कालावधी लोटला तरीदेखील जबाबदार दोषींवर अद्याप कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे तिवरे धरणाप्रमाणेच या दुर्घटनेचीही चौकशीचा फेरा सुरूच राहणार की काय, असा प्रश्न आता चिपळूणकरांना पडला आहे.www.konkantoday.com