केदार साठे यांनी युतीमध्ये मतभेद निर्माण करण्यापेक्षा युती मजबूत करावी, शशिकांत चव्हाण यांचा सल्ला
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार साठे यांनी भाजप आणि शिसेना यांच्या नैसर्गिक असणार्या युतीमध्ये मतभेद निर्माण करण्यापेक्षा युती अधिक मजबूत कशी होईल याकडे लक्ष द्यावे असा सल्ला शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी केदार साठे यांना दिला आहे.केदार साठे यांनी नुकतीच दापोली येथे पत्रकार परिषद घेवून आम्ही दापोली मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी उभा करणार असल्याचे जाहीर करत खासदार सुनिल तटकरे यांची दापोली मतदार संघात झालेल्या पिछाडी बाबत रामदास कदम जबाबदार आहेत. असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण नी केदार साठेंच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. www.konkantoday.com