एलटीटी-कोच्युवेली एक्सप्रेसला खेड स्थानकात थांबा द्या, खेडवासियांची मागणी
कोकण मार्गावरून धावणार्या एलटीटी-कोच्युवेली गरीबरथ एक्सप्रेसला खेड स्थानकात थांबा देण्याच्या मागणीचे निवेदन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.कोकण रेल्वे मार्गे धावणारी एलटीटी-कोच्युवेली गरीबरथ एक्सप्रेस २२ जूनपासून १५ डब्यांऐवजी २२ एलएचबी डब्यांची धावत आहे. या एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसादही लाभत आहे. मात्र कोकण मार्गावर गरीबरथ एक्सप्रेसला केवळ रत्नागिरी, मडगाव स्थानकातच थांबा देण्यात आला आहे. www.konkantoday.com