आश्वासन मिळाल्याने गडगडी धरण कृती समितीचा जलआक्रोश मोर्चा स्थगित
गडगडी धरण कृती समितीच्यावतीने २ जुलैला देवरूख तहसिलदार कार्यालयावर काढण्यात येणारा जलआक्रोश मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय अधिकार्यांकडून प्रलंबित मागण्यांसदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गडगडी धरण प्रकल्पाचे सुधारीत स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण होवून ते मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. धरणासंदर्भातील अपूर्ण कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन अधिकार्यांमार्फत देण्यात आले आहे.www.konkantoday.com