रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनची नवीन कार्यकारिणी जाहीर – अध्यक्षपदी हिराकांत साळवी, सचिवपदी डॉ. संदीप करे आणि खजिनदारपदी डॉ. वैभव कानडे यांची निवड

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने* 2024-25 च्या कार्यकाळासाठी आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली. रोटे. हिरकांत साळवी यांनी अध्यक्षपदाची, डॉ. संदीप करे यांनी सचिव पदाची तर डॉ. वैभव कानडे यांनी खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली. याच कार्यक्रमात *रोटरॅक्ट क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या* नव्या संघाची घोषणा करण्यात आली. युक्ता जैन हिने अध्यक्षपदाची, झलक जैन हिने सचिवपदाची तर आकांक्षा साळवी हिने खजीनदार पदाची जबाबदारी स्वीकारली.३० जून,२०२४ रोजी रंजन मंदिर हॉल, शिर्के हायस्कूलमध्ये झालेल्या पदग्रहण कार्यक्रमात इन्स्टॉलेशल ऑफिसर रोटे. डॉ. लेनी डी कोस्टा (DGN RID 3170), गेस्ट ऑफ ऑनर रोटे. अशोक नाईक आणि असिस्टंट गव्हर्नर रोटे. ऍड. शाल्मली आंबुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.गतवर्षीचे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष रोटे. बिपिनचंद्र गांधी, सचिव डॉ. स्वप्ना करे आणि खजिनदार जयेश दिवाणी तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या गतवर्षीच्या टीममधील अध्यक्ष आर्य आंबुलकर, सचिव राजस सुर्वे आणि खजिनदार झलक जैन यांच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केतनकुमार चौधरी आणि सुवर्णा चौधरी यांनी केले. त्यांना सौ. यज्ञा माणगावकर, सौ. रिया गांधी, सौ. प्रज्ञा गांधी, सौ. पूजा साळवी, सौ. माधवी भाटकर, यज्ञा जोशी, युथिका पतंगे, मृण्मयी पतंगे, तरुण जैन यांनी सहकार्य केले. रोटरीच्या प्रोटोकॉलप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम पार पडला.याच समारंभात क्लबच्या वार्षिक बुलेटिन “रत्नांकुर”चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. “रत्नांकुर”च्या निर्मितीमध्ये एडिटर बिपीनचंद्र गांधी, संकलक राजेंद्र (दादा) कदम आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. डॉ. लेनी डी कोस्टा यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांना रोटरीच्या सेवेच्या आणि समर्पणाच्या मूल्यांची माहिती देऊन प्रेरित केले. गेस्ट ऑफ ऑनर अशोक नाईक यांनी नव्या टीमचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या निमित्ताने क्लबच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार प्राप्त रत्नागिरीचे सुपुत्र श्री सुनील बेंडखळे यांचा देखील सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी क्लबचे आणि रोटरॅक्ट क्लबचे नवीन नेतृत्वाने त्यांनी आगामी वर्षातील त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व सदस्यांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि सहकार्याचे आवाहन केले आहे.रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे पुढील वर्ष फ्रेंडशिप, फेलोशिप आणि सर्व्हीसच्या तत्वांवर आधारित अनेक लोकोपयोगी प्रकल्पांनी समृध्द करण्याचा मानस अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात केदार माणगावकर, दिगंबर मगदुम, ऍड.विनय अंबुलकर, राजेंद्र (दादा) कदम आणि इतर सर्व रोटेरियन्सनी सहकार्य केले.नवनिर्वाचित सचिव डॉ. संदीप करे यांनी प्रमुख पाहुणे, आयोजक समिती आणि स्वयंसेवकांच्या प्रयत्नांची दखल घेऊन सर्वांचे आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button