
रत्नागिरी महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने महावितरणच्या नाचणे कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.महावितरणचे कंत्राटी कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत. अनेक आंदोलन करून आणि मागण्यांसाठी ४८ तासांची मुदत देऊनही त्या मान्य न झाल्याने सहाव्या टप्प्याच्या आंदोलनाला सुरवात झाली. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने नाचणेतील कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर व वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या वतीने एकूण २४ विविध वीज संघटनांनी एकत्रितपणे राज्यस्तरावर कंत्राटी वीज कामगारांच्यादृष्टीने आंदोलन छेडले आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी महावितरण परिमंडल कार्यालयाबाहेर हे आंदोलन आठवड्याने पुन्हा सुरू करण्यात आले होते. प्रमुख मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.www.konkantoday.com