रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरी मंदिरात गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने एका तरुणांकडून पुजारी व त्यांच्या मुलाला मारहाण.
*संपूर्ण रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरी मंदिरात एका तरुणाला गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने पुजाऱ्यांसह दोन जणांना मारहाण केल्याने ते जखमी होण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे रत्नागिरीतील एका तरुणाला गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने पुजाऱ्यांसह दोन जणांना त्याने जखमी केल्याची घटना घडली आहे रत्नागिरीतील श्री भैरी देवस्थान रत्नागिरी करांच्या श्रद्धेचे स्थान असून अनेक भाविक या ठिकाणी श्रद्धेने येत असतात मात्र आज अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कर्ला येथे राहणारा एक युवक नेहमीप्रमाणे मंदिरात आला आल्यावर त्याने भैरीबुवाला नमस्कार केला आणि गाभाऱ्यात जाऊन भैरी च्या बाजूला असलेल्या त्रिमूखी देवीच्या पायाजवळ चक्क मांडी घालून बसला.या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेले लोक हादरलेत्यावेळी मंदिरात हजर असलेले पुजारी चंदू गुरव यांनी या युवकाला अटकाव केला.या युवकाने पुजारी गुरव यांच्या डोक्यात त अंगाऱ्याचे भांड मारलं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा समीर गुरव पुढे आलेला असताना त्याच्या डोक्यात घंटा घातली तर त्यांना देवळात कर्मचारी म्हणून काम करत असलेले गावडे यांनाही मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली दरम्यान जखमी पुजारीचंदू गुरव व त्याचा मुलगा समीर गुरव याना शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्याने पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात नेल्याचे समजते शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी घटनास्थळी भेट दिली. युवकांनी हा प्रकार का केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही