मोबाईलचा वापर करून बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या संशयित आरोपीला अटक
रेल्वेमध्ये महिलेच्या पर्समधील मोबाईलचा वापर करून बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या संशयित आरोपीला संगमेश्वर पोलिसांकडून सोमवारी (दि.१) अटक केली. मनिष रमेश पावसकर (वय ३१, रा. जानवळे, ता.गुहागर, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ या आपल्या पतीसह २५ जून रोजी दादर ते ते सावंतवाडी दरम्यान रेल्वेने प्रवास करत होत्या. यादरम्यान रात्री तीनच्या सुमारास त्यांना झोप लागल्याचे पाहून चोरट्याने त्यांची पर्स चोरून नेली होती. त्यानंतर कडवई येथील रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांच्या पर्समध्ये त्यांचा मोबाईल, रोख रक्कम , पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे होती ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी वैभववाडी (जि. सिंधूदुर्ग) येथे जावून त्यांचे बैंक खाते पाहिले असता त्याचे खात्यातील १ लाख कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढल्याचे दिसून आलेत्यांनतर त्यांनी २६ जूनला वैभववाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या गुन्हयाचा तपास करत असताना पोलिसांना संशयीत मनिष पावसकर हा संशयितरित्या रेल्वे परिसरात आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पर्स चोरीची कबुली दिली. ही कामगिरी घनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, मा. निलेश माईनकर उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नागरगोजे यांच्या सुचनेनुसार सपोफौ सी. टी. कांबळे, व्ही. बी. बरगाले, व्ही. व्ही. मनवल, एस. व्ही. आव्हाड यांनी तपास केला.www.konkantoday.com