
मांडवी एक्सप्रेसची धडक बसल्याने युवतीचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रूक रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या × वर्षीय युवतीला मांडवी एक्सप्रेसची धडक बसल्याने ती खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला रेल्वेच्या दवाखान्यात चिपळूण येथे आणले असता डॉक्टरने तिला मृत घोषित केले. ही घटना काल सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली.दहिवली बुद्रूक रोहिदास वाडी येथे मामाकडे शिक्षण घेण्यासाठी आलेली प्रतिज्ञा दिपक चव्हाण (२०, रा. देवूड, जाकादेवी, जि. रत्नागिरी) ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उभी होती. याच दरम्यान प्रतिक्षाचा मावस भाऊ व आजोबा जवळच उभे होते. याच दरम्याने मुंबईच्या दिशेने जाणार्या मांडवी एक्सप्रेसची धडक प्रतिक्षाला बसली. www.konkantoday.com