पानवल ते ब्रिज ते कोंडवी या परिसरातील रेल्वे रुळाच्या लोखंडी चाव्यावर चोरट्यांचा डल्ला
कोकण रेल्वे विभागाच्या पानवल ते ब्रिज ते कोंडवी या परिसरातील रेल्वे रुळाच्या 12 हजार रुपयांच्या लोखंडी चाव्या अज्ञाताने चोरुन नेल्या. ही घटना शुक्रवार 28 जून रोजी दुपारी 2 ते शनिवार 29 जून रोजी सकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे.याप्रकरणी रेल्वेचे कर्मचारी रविंद्र चंद्रकांत पावसकर (46,रा.कोंडवी पोस्ट चांदेराई,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे कोकण रेल्वे विभागाच्या पानवल ब्रिज ते कोंडवी या परिसरामध्ये रेल्वे कि.मी 210/9 ते 210/0 मध्ये रेल्वे रुळाच्या 11 हजार 872 रुपये किंमतीच्या एकूण 223 लोखंडी चाव्या अज्ञाताने चोरुन नेल्या. याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.