
दापोली तालुक्यातील विसापूर येथे मुंबई-दापोली गाडीला अपघात
दापोली तालुक्यातील विसापूर येथे दापोली आगाराच्या मुंबई-उन्हवरे बसची मागील बाजूची चाके निघून अपघात झाला. यात प्रवासी सुखरूप असल्याचे दापोली आगाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रात्री ११ वा. मुंबई येथून सुटलेली दापोली आगाराची मुंबई-उन्हवरे बस (क्र. एम.एच. २० बीएल २११८) ही बस दापोलीकडे रवाना झाली होती. ही बस पहाटे ५.३० च्या सुमारास विसापूरजवळ आली असता अचानक या बसच्या मागील डाव्या बाजूचा एक्सल तुटून चाके बाहेर पडली. त्यामुळे विसापूरजवळ बस मुख्य रस्त्यात थांबली. या बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्रत्र यात कोणालाही दुखापत झालेली नाही. गाडी रस्त्यात थांबल्याने इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे दापोली आगाराच्या गाडी दुरूस्ती विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून गाडी दुरूस्त केली. त्यानंतर ही गाडी आगारात आणण्यात आली. www.konkantoday.com