डिस्पोजेबल मशिन न बसविणार्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून कारणे दाखवा नोटीस
जिल्हा परिषदेकडून आलेल्या कारणे दाखवा नोटसला तालुक्याचे विस्तार अधिकारी व संबंधित गावाच्या ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे. जिल्हा परिषदेने फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या या नोटीस संदर्भात विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांनी अद्याप कोणताच अहवाल पाठवलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधितांकडून निवडणुकीच्या काळाचा हवाला दिला जात होता. पण निवडणुकीनंतरही जिल्ह्यातील उर्वरित २०८ गावांमध्ये पूड डिस्पोजेबल मशीन संदर्भात जिल्हा परिषदेची उदासिनताच दिसत आहे.ग्रामीण भागातील महिलांसाठी पॅड डिस्पोजेबल मशीन बसविण्यासंदर्भात असलेली योजना जिल्ह्यातील अनेक गावांनी अद्याप राबवलेली नाही. अशा गावांना आता जि.प.ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर आता उर्वरित सर्व ग्रामपंचायतींमध्ये पॅड डिस्पोजेबल मशीन बसविण्याची लगबग सुरू झाली आहे. www.konkantoday.com