
चिपळूण शहरातील १३४ घरांना दरडीचा धोका
चिपळूण शहरातील विविध भागातील १३४ घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे त्यांना स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीसा नगर परिषदेने यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र अनेकांकडे राहण्याची अन्य व्यवस्था नसल्याने भीतीच्या छायेखाली ते त्याच घरात राहत असल्याचे चित्र दिसत आहे.शहरातील काही वस्त्या डोंगर भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने केलेल्या सर्व्हेनुसार १३४ घरांना दरडीचा धोका असल्याचे दिसले. त्यामुळे नगर परिषदेचे खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना नोटीस देवून पावसाळ्यात या घरांमधून स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अनेकांकडे अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्याने ते याच घरांमध्ये भीतीच्या छायेखाली वास्तव्य करीत असल्याचे दिसत आहे.www.konkantoday.com