चिपळूण शहरातील उक्ताड मैदानासाठी १ कोटीचा निधी मंजूर
चिपळूण शहरातील उक्ताड मैदानासाठी १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून आलेल्या या निधीतून मैदानात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याने मैदानाला नवा लूक येणार आहे. पहिल्या टप्प्यात काय करावे, याचे रविवारी माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्यासह माजी नगरसेवकांनी नगर परिषदेच्या अधिकार्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार आता लवकरच या मैदानाचा आराखडा तयार केला जाणार आहे.उक्ताड, भेंडीनाका, अर्धी बाजारपेठ, खेड आदी भागात राहणार्या खेळाडूंसाठी कोठेही मैदान नाही. त्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या उक्ताड मैदानाला काही वर्षापूर्वी प्रकाशझोतात आणण्यात आले आहे. सुमारे ३ एकर जागा असलेल्या या मैदानाला करोडो रुपये खर्च करून उत्तम दर्जाची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तर वाशिष्ठी व शिवनदीतून काढला गेलेला गाळ येथे टाकून त्याची चिपळूण-गुहागर मार्गाएवढी उंची करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा खेळाडू वापर करताना दिसतात.www.konkantoday.com