
फुणगूस बंदराला सुमारे १०० मीटर लांबीची जेटी उभारल्यास येथील बाजारपेठ तसेच घरांना पूर्ण संरक्षण मिळेल
संगमेश्वर नजिकच्या फुणगूस परिसरातील खाडीचा बदलणारा प्रवाह आणि दरवर्षी येथील बाजारपेठेला बसणारा पुराचा फटका, यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी फुणगूस बंदराला सुमारे १०० मीटर लांबीची जेटी उभारल्यास येथील बाजारपेठ तसेच घरांना पूर्ण संरक्षण मिळेल तसेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या या खाडीपरिसरात एक उत्तम पर्यटन केंद्र तयार होवून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. निवारणासाठी दिलेल्या निधीतून येथील जेटी विकसित करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.
फुणगूस येथील खाडीपात्र गाळाने भरून पाण्याचा प्रवाह बदलला आहे. १०० मि. मी. पावसातदेखील पुराचे पाणी येथील जुनी बाजारपेठ आणि खाडीलगतच्या घरामध्ये घुसून दरवर्षी प्रचंड नुकसान होते. पुरापासून संरक्षण मिळण्यासाठी संरक्षण भिंती उभारण्यापेक्षा जेटीचा पर्याया हा संरक्षण तसेच विकासाचे मार्ग मोकळा करणारा ठरणारा आहे. www.konkantoday.com