गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी विभागाला नव्या कोर्या १५० एसटी बस प्राप्त होणार
राज्य परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागाला नव्या कोर्या १५० एसटी बस प्राप्त होणार आहेत. या बस गणेशोत्सवापूर्वी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बसच्या चार्जिंगसाठी ४ आगारांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. लवकर हे देखील काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. नव्या इलेक्ट्रीक बसमुळे मुंबई-पुण्यातून येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.महामंडळाकडून इंधनावर होणारा वाढता खर्च व प्रदूषण रोखण्यासाठी विजेवर चालणार्या बसचा पर्याय सुचविण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील सर्वच विभागांना इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रत्नागिरी विभागासाठी १५० बस देण्यात येणार आहेत. या बस केवळ ४५ मिनिटात चार्जिंग होवून सुमारे २५० किलोमीटर जावू शकतात. त्यामुळे इंधनाची मोठी बचत होणार आहे. रत्नागिरी विभागामध्ये रत्नागिरी, चिपळूण, खेड व दापोली या आगारांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.www.konkantoday.com