लांजा तालुक्यातील कणगवली तेलीवाडी येथेविजेचा शॉक लागून गाईचा मृत्यू
विजेचा शॉक लागून गाईचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी लांजा तालुक्यातील कणगवली तेलीवाडी येथे सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहेकणगवली तेलीवाडी येथील मारुती श्रीधर चव्हाण यांनी आपली गुरे रानात चरायला सोडली होती. त्यातील एका गाईला कणगवली तेलीवाडी वेताळ देव मंदिर या ठिकाणी विजेचा शॉक लागून या गाईचा मृत्यू झाला आहे .यामध्ये मारुती चव्हाण यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .www.konkantoday.com