मंडणगड मध्ये बेदरकारपणे गाडी चालवणा-यांवर गुन्हा दाखल

मंडणगड शहरात बेदरकारपणे गाडी चालवून अपघात करण्यास कारणीभूत असलेल्या गाडीचे चालका विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात 30 जून 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहीतीनुसार (30) रोजी गाडीमालक अरबाज हनिफ वाडकर वय 27 राहणार किंजळघर, व इरफान सिराज मोमीन राहणार धुत्रोली वय 28 गाडीचालक आपल्या ताब्यातील इको गाडीने (एम.एच. 43. ए.एन. 7667 गाडी क्रमांक) किंजळघर कडे जाते होतेगाडीचे चालकाने गाडी बेदरकारपणे चालविल्याने गाडी रस्ता सोडून मंडणगड शहरातील परिवार पार्क समोरीन नाल्यामध्ये जाऊन अपघात होऊन गाडी प्रवास करणारे दोघेही जखमी झाले व गाडीचे नुकसान झाले मंडणगड पोलीस स्थानकात गाडीचे चालका विरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बी एस बाणे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button