पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली

*भारतीय जनता पक्षानं विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर सातत्यानं त्यांचं राजकीय पूनर्वसन करण्यात यावं अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यावर्षी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पराभव केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button