तरूणीसमोर लज्जास्पद वर्तन, चिपळुणातील विकृत तरूणावर पोस्कोंतर्गत गुन्हा

तरूणी समोर येताच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या विकृत तरूणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. या तरूणावर चिपळूण पोलिसांत पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या तरूणाने काही दिवसांपूर्वी एकाा महाविद्यालयातील विद्यार्थीनी समोर येताच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते. यावेळी विकृताचा चेहरा स्पष्टपणे दिसला नव्हता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. हा विकृत तरूण कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महाविद्यालय परिसरात शहरातील सार्वजनिक ठिकाणी वॉच ठेवला होता. अशातच शनिवारी दुपारी या विकृत तरूणाने एका तरूणीसमोर असाच प्रकार केला. या तरूणीने याची माहिती नागरिकांना दिल्यानुसार त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button