
कोंडसर खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून दुर्देवी मृत्यू
राजापूर तालुक्यातील कोंडसर येथील दोन प्रौढांचा खाडीच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घटली आहे. रविवारी सांयकाळी सहाच्या सुमारास कोंडसर खाडीत सुनिल केशव घाणेकर (58) संदिप केशव मोगरकर (45) मासेमारी साठी गेले होते मासेमारी करत असताना तोल जावून खाडीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे मृतदेह सापडले असून सागरी पोलीस ठाणेचे प्रभारी अविनाश केदारी, यांसह पिलनणकर, चव्हाण कुशल हातिसकर या आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.