
भांबेड वळणवाडी येथेे आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्या
आजाराला कंटाळून ४५ वर्षीय तरूणाने नदीच्या किनारी जांभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भांबेड वळणवाडी येथेे १७ एप्रिल रोजी दुपारी १२ पासून ते १८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० च्या कालावधीत घडली.पोलिसांच्या माहितीनुसार भांबेड वळणवाडी येथील दीपक महादेव भोमसकर याला दारूचे व्यसन होते. तसेच तो गेले काही वर्षे आजारीही होता. आजाराला कंटाळून तो बुधवारी दुपारी १२ वा. घरातून निघून गेला होता. त्यानंतर शोधाशोध करूनही तो सापडला नव्हता. अखेर गुरूवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. भांबेड येथील मुचकुंदी नदीजवळ जांभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत होता. www.konkantoday.com