आरती दिगंबर चंद्रवंशी हत्या प्रकरणातील आरोपी समाधान माळी याने वरोरा पोलीस ठाण्यात बुटाच्या लेसने गळफास घेऊन केली आत्महत्या

आनंदवन येथील आरती दिगंबर चंद्रवंशी (२५) हत्या प्रकरणातील आरोपी समाधान माळी (३१) याने वरोरा पोलीस ठाण्यात बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत आरोपी समाधान याने प्रेयसी आरती हिची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता, अशीही माहिती समोर आली आहे.दरम्यान या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्टेशन डायरी प्रमुख व पोलीस शिपाई अशा दोघांना निलंबित करण्यात आले आहे.थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे वास्तव्यास असलेल्या अंध वडील व आईची मुलगी असलेल्या आरती चंद्रवंशी या मुलीची आरोपी समाधान माळी याने बुधवार २६ जून रोजी रात्री ८.३० वाजता धारदार चाकूने हत्या केली होती. आरोपी समाधान याला वरोरा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. २८ जून पासून आरोपी माळी वरोरा पोलिस ठाण्यात कोठडीत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रेमप्रकरणातून आरोपीने आरतीची हत्या केल्याचे समोर आले. मात्र हत्या करण्यापूर्वी आरोपी समाधान याने आरतीवर बलात्कार केला होता अशी माहिती तपासात उघडकीस आल्याने पोलिस अधीक्षक मुम्मकासुदर्शन यांनी सांगितले. बलात्काराची घटना उघडकीस आली तेव्हापासून आरोपी डिप्रेशन मध्ये होता.दरम्यान रविवार ३० जून रोजी सकाळी आरोपी पोलिस कोठडीत असताना तेथील संडास मध्ये प्रातविधीसाठी गेला होता. समदास मध्येच त्याने पायाच्या बुटाची लेस काढून गळफास लावून आत्महत्या केली.,www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button