आंबा घाटातील मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दरीत आढळलेल्या मृतदेहाची दुसर्या दिवशी देखील ओळख पटविण्यास पोलिसांना अपयश आले. मृतदेहाजवळ ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. घाटातील विसावा पॉईंटजवळ असलेल्या ३५ फूट खोल दरीत ५० वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह शनिवारी दुपारी आढळला. मृतदेहाजवळ ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मात्र देवरूख पोलीस अथक मेहनत घेत त्याचे धागेदोरे शोधण्याचे व नातेवाईकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. ओळख पटविण्यासाठी हा मृतदेह रत्नागिरी येथे ठेवण्यात आला आहे.www.konkantoday.com