अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेवून अश्‍लील चाळेप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेवून अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी सुनिल यशवंत शिंदे (दापोली) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून तिच्याशी अश्‍लील चाळे करून त्रास दिल्याप्रकरणी भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ८, १२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंदे हा २० ऑगस्ट २०२३ पासून पीडीत मुलीला त्रास देत होता. मुलीचा पाठलाग करणे, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, झाल्या प्रकाराबद्दल घरी कोणाला सांगितले तर तुला, वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने याबाबत घरी कोणाला काहीही सांगितलेले नव्हते. १५ जून नंतर पुन्हा सुनील शिंदे हा दिसल्याने तो परत आपल्याला त्रास देईल या भीतीने पीडित मुलगी आजारी पडली.तिला दवाखान्यात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. ५ दिवसांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर जेव्हा घरी आणले तेव्हा तिला विचारणा केली असता २० ऑगस्ट २३ ते जून २४ पर्यंत घडलेला सगळा प्रकार तिने घरच्यांना सांगितला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button