
रायगडमध्ये दोन एसटी बसेसचा भीषण अपघात दोन्ही चालक गंभीर जखमी.
रायगडमध्ये दोन एसटी बसेसचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. अलिबाग रेवदंडा मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे*. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. तर दोन्ही एसटी बसेसचे ड्रायव्हर गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अलिबाग- रेवदंडा मार्गावर बेलकडे फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही एसटीच्या पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. त्यामुळेच दोन्ही एसटी बसेच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे. तर बसमधील 15 ते 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि पोलिसांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.




