
हापूससाठी नोंदणी अनिवार्य
राज्यात ३०६ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत. त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची भाजी, फळ, फुले यांची विक्री होते. या व्यवस्थेमध्ये विक्री होणार्या आंब्यांनाा हापूस नावाने उलाढाल करायची असेल तर त्यांची नोंदणी करणे आवश्यक असेल. अन्यथा बाजार समित्यांना हापूस आंबा हा शब्द वापरता येणार नाही. त्यासाठी आवश्यक ते निवेदन पणन संचालकांना देण्यात येईल, अशी माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि प्रक्रियादार संस्थेचे सचिव मुकुंदराव जोशी यांनी दिली.ते म्हणाले, राज्यात बहुतेक तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. यामध्ये फळांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या ठिकाणचे आंबे देखील विकले जातात. कोकणातील ५ जिल्ह्यांमध्ये तयार झालेल्या हापूस आंब्याला भौगोलिक नामांकन मिळाले आहे. कोणत्याही बाजार समितीत हापूस म्हणून आंब्याची खरेदी-विकि करायची असेल तरे करणार्यांना कायद्याप्रमाणे नोंदणी घ्यावी लागेल. नोंदणी करण्यासाठी विशिष्ट ४ संस्थांना प्राधिकृत करण्यात आले आहे.www.konkantoday.com