
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान स्टॉप समोरीलभागात कुणी अज्ञात व्यक्तींनी टाकली दारूच्या बाटल्यांची रास
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान स्टॉप समोरीलभागात कुणी अज्ञात व्यक्तींनी दारूच्या बाटल्यांची रास ओतून किल्ल्याचे पावित्र, व ऐतिहासिक महत्वाला बाधा आणण्याचा प्रयत्न काल रात्री करण्यात आला आहे.या भागातील लाईट गेले असताना हे कृत्य करण्यात आले आहे.दारूच्या बाटल्यांचा खच आहे तो एकाच कंपनीच्या बाटल्यांचा आहे.स्थानिक ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आल्यावर प्रचंड चिड निर्माण झाली असून,लवकरात लवकर याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.