बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ल्यातच
बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प वेंगुले बंदर परिसरात व स्कुबा डायव्हींग प्रकल्पही वेंगुर्ले-मालवण दरम्यान समुद्रात होणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नौदलाच्या युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे पुढील अवघ्या आठ महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनालाही आता खर्या अर्थाने झळाळी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या वेंगुर्ले तालुका पुढील काळात निश्चितच आघाडीवर येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला चालना मिळाली, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली. www.konkantoday.com