पाली ग्रामीण रूग्णालयात ८ बालकांवर अवघड शस्त्रक्रिया
पाली ग्रामीण रूग्णालय येथे प्रथमच ८ लहान मुलांवर अत्यंत अवघड अशा मुखाच्या, जिभेच्या, लघवीच्या वाटेवर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. सात महिलांची सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. सध्या पाली ग्रामीण रूग्णालयामध्ये असणार्या सुसज्ज अशा शस्त्रक्रियागृहामध्ये शस्त्रक्रिया होत असल्याने चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.पाली ग्रामीण रूग्णालय हे रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा या तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रूग्णांची संख्या जास्त असते. परंतु मागील काही वर्षे येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची गैरसोय होत होती. परंतु पाली ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुमरे यांनी यथे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केल्याने त्याचा फायदा रूग्णांना होत आहे.www.konkantoday.com