तांत्रिक बिघाडामुळे थांबलेली खतविक्री पुन्हा सुरू

तांत्रिक बिघाड असल्यामुळे देवरूखात खत विक्री बंद होती. यामुळे तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या शेतकर्‍यांना खताविना परतावे लागत होते. हा प्रकार भाजपा पदाधिकार्‍यांच्या निदर्शनास येताच खत विक्रेत्यांची भेट घेण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत आलेला शेतकरी खताविना परत जाता कामा नये, शेतकर्‍यांची गैरसोय होवू नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. अखेर अधिकारी वर्गाने तोडका काढत खत विक्रेत्यांना खत विक्री करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे खत खरेदीसाठी आलेले शेतकरी खूष होत खत घेवून घरी परतले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button