
इंडियन स्टुडंट कौन्सिलचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना दिला जातो. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी २०२३-२४ या वर्षाचा विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार इंडियन स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी सामाजिक न्याय दिनानिमित्त घोषित केले.सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांना सांस्कृतिक क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील डॉ. उदय निरगुडकर, राजकीय क्षेत्रातील बच्चू कडू, सामाजिक क्षेत्रातील डॉ. महेश देशमुख आणि शैक्षणिक क्षेत्रातील डॉ. महेश पाटील, संशोधन क्षेत्रातील डॉ. बळीराम गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. डॉ. धनाजी धोरे, प्रा. माधुरी राऊत, प्रा. डॉ. सिमा शेटे, प्रा. डॉ. दीपाली भावे, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा. डॉ. प्रज्ञा लोखंडे, प्रा. मयुरी कुंभार, प्रा. डॉ. आरती गायकवाड, प्रा. संयोगीता सासणे, प्रा. डॉ. प्रज्ञा कमडी, प्रा. वैशाली दामले, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, मनोज हिवाळ, पौर्णिमा बनसोड, कमल येउल, प्रा. कविता कटारे, प्रा. डॉ. वैशाली बेटकर, सारा पवार आदींनी दिली आहे. www.konkantoday.com