आम्ही आमचे राजकीय बळी देणार नाही. उलट सहव्याज हिशोब चुकता करू,-ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत
* सुपुत्राला जिल्हा परिरषदेत पाठवण्यासाठी कट्टर समर्थकांचे राजकीय बळी घेतलेत आणि आता त्यांना आमदार करण्यासाठी माझा आणि सचिन कदम यांचा राजकीय बळी घेतलात, अजून किती बळी हवेत? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी उपस्थित करत स्वकियांना घरचा आहेर दिला आहे पण लक्षात असून द्या, आम्ही आमचे राजकीय बळी देणार नाही. उलट सहव्याज हिशोब चुकता करू, असा रोखठोक इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे उबाठा गटातील हा अंतर्गत वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे.यासंदर्भात संदीप सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राजकारणात अपेक्षा-इच्छा ही असावी. पण ती असुरी इच्छा असू नये. पक्षाला वेठीस धरून स्वतःची आणि मुलाची इच्छा पूर्ण करून घेणे याला नैतिकता म्हणत नाहीत तर ती एक प्रकारे छळवणूक ठरते. भास्करराव आता तेच करत आहेत. त्यांनी पक्षाला वेठीस धरून पदाधिकार्यांचा छळ सुरू केला आहे. ही त्यांची जुनी पद्धत आहे. राष्ट्रवादीत असतानादेखील त्यांनी हेच केले. सुपुत्राला जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी विजय गुजर सारख्या एका निष्ठावंताचा राजकीय बळी घेतला. आपल्या आमदारकीत अडचण नको म्हणून रामदास राणे, दादा कदम असे अनेकांचे पंख छाटून बाजूला केलेत. आता सुपुत्रासाठी देखील तीच राजकीय खेळी सुरू केली आहे, असा गंभीर आरोपदेखील संदीप सावंत यांनी केला आहे. www.konkantoday.com