अर्थसंकल्पात कोकणातील कातळशिल्पे अधोरेखित

कोकणातील विस्तीर्ण कातळसड्यावर कोरण्यात आलेल्या अश्मयुगीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत यापूर्वीच स्थान प्राप्त झाले आहे. अजूनही कोकणपट्ट्यात नवनवीन कातळशिल्प प्रकाशात येत आहेत. या कातळशिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने कार्यवाही सुरू आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात येथील कातळशिल्पांची दखल घेत युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला आहे.राज्य एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यामध्ये कोकणातील कातळशिल्पांचा विषयही प्रकर्षाने मांडण्यात आला आहे. जागतिक वारसा मानांकनासाठी शिवकालीन किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कोकणातील कातळशिल्पांसह, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव या बाबतचे प्रस्तावही पाठवण्यात येणार आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button