
राज्यात पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामध्ये नगर, पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून १५ मे पर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. तर, मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात उद्यापासून पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे.www.konkantoday.com