सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम याने गळफास घेत संपवले जीवन.
* सांगली-* अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान सुरज जनार्दन निकम (वय-३०) याने काल शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम याचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.